“जय भवानी! जय जिजाऊ ! जय शिवराय!
मित्रांनो फेब्रुवारी महिना आला की चातक पक्षाला ज्याप्रमाणे पावसाची ओढ लागते अगदी त्याचप्रमाणे शिवप्रेमींना 19 फेब्रुवारीची ओढ लागते.
मागील काही वर्षात
शिवजयंती घराघरात आणि शिवराय मनामनात पोहचले आहेत. अर्थात यामध्ये सोशल मीडियाचे पण फार मोठे योगदान आहे. सोशल मीडियामुळे शिवजयंती उत्सव हा दरवर्षी ग्लोबल आणि वाढत चालला आहे. ही एक आनंदाची बाब जरी असली तरी दरवर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावर काही वाद सातत्याने उभे राहतात. तर काही जाणून बुजून उभे केले जातात. असो.
मित्रानो या मधीलच काही वादाचे आणि कळीचे मुद्दे म्हणजे शिवजयंती पहिल्यांदा कोणी सुरू केली. शिवजयंतीची म्हणजे शिवजन्माची खरी तारीख काय ? किंवा
शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार ? यामध्ये काहीजण 19 फेब्रुवारी ला म्हणतात, तर काहीजण तिथीनुसारच शिवजयंती साजरी केली पाहिजे असं ठामपणे सांगतात.
पण खरी तारीख नेमकी कोणती? आणि हा गोंधळ का नेमका काय आहे? शिवजयंती कधी साजरी केली पाहिजे. या रहस्याचा उलगडाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत”
नमस्कार मी योगेश. माझ्या ब्लॉग वर आपले मन:पूर्वक स्वागत..
मित्रांनो
शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या तिथीला झाला.
तर इंग्रजी कॅलेंडरनुसार ही तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी पडते.
हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित असते, त्यामुळे प्रत्येक वर्षी तिथी बदलते.
यामुळेच लोक शिवजयंती ही तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला साजरी करतात.
पण काहींचं म्हणणं आहे की शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे.
असं सांगितलं जातं की 1869 मध्ये महात्मा फुले यांनी 19 फेब्रुवारीला पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली.
त्यावेळी मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यानुसार हीच तारीख अधिकृत ठरवण्यात आली आणि आजही सरकार हीच अधिकृत तारीख मानते.
तर एकीकडे
आपल्या संस्कृतीत रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी हे सण नेहमी तिथीनुसार साजरे होतात.
आणि शिवराय काही आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत त्यामुळे काही शिवप्रेमी महाराजांची जयंती फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी तिथी नुसार साजरी करतात.
पण दोन्ही पैकी कोणती तारीख योग्य आहे हे जर सांगायचं ठरल तर
मित्रांनो, दोन्ही तारखा योग्यच आहेत असेच म्हणावं लागेल !
कारण
✔शिवजयंती सरकारी स्तरावर 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते.
✔ तर धार्मिक स्तरावर फाल्गुन वद्य तृतीयेच्या तिथीनुसार साजरी केली जाते.
शिवजयंती कोणी कधीही साजरी करो.
महत्त्वाचं काय आहे तर शिवविचारांचा जागर..
शिवजयंती मुळात एक दिवसाचा उत्सव नाही, तर एक विचारांचा जागर आहे!
शिवरायांचे विचार पाळणे, समाजासाठी योगदान देणे आणि त्यांची शिकवण आचरणात आणणे—हीच खरी शिवजयंती आहे !
त्यामुळे शिवजयंती कोण कधी साजरी करतो यापेक्षा तो शिवजयंती कशा पद्धतीने साजरा करतो हे फार महत्त्वाचं आहे. कोणी शिवजयंती तारखेनुसार करतोय आणि कोण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतोय म्हणून चुकीचा किंवा शत्रू ठरत नाही. तर याउलट जो जो शिवजयंती साजरी करतो आणि जो जो शिवरायांना मानतो तो आपलाच आहे मग तो तारखेनुसार शिवजयंती साजरी करणारा असो किंवा तिथेनुसार शिवजयंती साजरी करणारा असो. मित्रांनो प्रत्येकाचे आपापले विचार असतात प्रत्येकांची आपापले मते असतात प्रत्येकांच्या मतांचा आणि विचारांचा आदर करूयात आणि ज्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची त्यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी तर ज्यांना तारखेनुसार साजरी करायचे त्यांनी तारखेनुसार देखील साजरी करावी.
शेवटी आपला राजा आहे आणि आपल्या राजाने आपल्याला एकत्र राहायला शिकवला आहे त्यामुळे शिवरायांच्या नावावरून जर कोणी अशा प्रकारचा तारखेवरून वाद निर्माण करून आपल्यांला वाटू पाहत असेल तर अशाप्रकारचा कावा आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीला अशा प्रकारचे आपल्या मधील मतमतांतरे आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून तारखेनुसार शिवजयंती साजरी करणाऱ्यानी तिथीनुसार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि तिथी नुसार शिवजयंती साजरी करनाऱ्यानी तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली पाहिजे.
शेवटी दोन्हीचा उद्देश एकच असायला हवा..
तो म्हणजे शिवजयंती घराघरात आणि शिवराय मनामनात.
मित्रांनो शिवजयंतीनिमित्त विधायक आणि समाज प्रबोधन पर कार्यक्रम, उपक्रम राबवून आपण एक आदर्श शिवजयंती साजरी करून शिवरायांना मानवंदना देऊ शकतो.
आदर्श शिवजयंती कशी साजरी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ देखील पाहू शकता.
बाकी तुम्ही तुमच्या गावात शिवजयंती कधी साजरी करता ?
तिथीनुसार कि तारखेनुसार.
याबद्दलचं तुमची प्रतिक्रीया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
🚩जय भवानी.. जय जिजाऊ.. जय शिवराय…
जय शंभुराजे…!