महाराष्ट्रात एकदा तरी जातीय किंवा धार्मिक दंगल झालीच पाहिजे.
नमस्कार मित्रांनो टायटल वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा असा का बरळतोय पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एखादी तरी जातीय दंगल किंवा धार्मिक दंगल घडावी यासाठी सातत्याने मागील काही वर्षांपासून इथले राजकारणी, राजकारण्यांचे काही पक्षीय दलाल आणि जातीय बांडगुळनी चंग बांधला आहे.
होय बरोबर ऐकताय.
मित्रांनो जातीजातीमध्ये द्वेष पसरवणे.
कोणत्याही घटनेला जातीय वळण देणे. हिंदू-मुस्लीम दरी कशी वाढेल यासाठी जाणून-बुजून ठरवून वक्तव्य करणे.
ज्याचा आज वर्तनामध्ये काहीही फायदा नाही असे इतिहासातील जूने वाद उकरून काढणे.
जाणून बुजून हिंदू- मुस्लिम वाद छेडणे. आणि अशा प्रकारच्या, घटनांना बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी मीडियाला पैसे पुरवणे. मग मीडियानेही अशा बातम्या ला जाणून बुजून अधिकचे कव्हरेज देणे.
हे सगळं बघता एकंदरीतच असं वाटते की इथल्या राजकारण्यांना आणि राजकारण्यांच्या पक्षीय दललानां निश्चितच असं वाटत असावं की या ठिकाणी एकतरी जातीय दंगल किंवा धार्मिक दंगल घडलीच पाहिजे.
आणि त्याचं कारण म्हणजे यांना या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत असलेले अठरापगड जात आणि सर्व धर्मीय लोक आणि त्यांचा थोडफार असलेला आनंद देखील कदाचित देखत नाहीये.
आणि त्याचमुळे कदाचित यांना जातीय किंवा धार्मिक दंगल घडावी असे वाटते.
जेणेकरून सामान्य जनतेला असुरक्षित वाटेल..
आणि मग हे इवळत कळवळत आमच्याकडे येतील आमचे पाय धरतील आम्हाला तारणहार समजतील. आमच्याकडे सुरक्षेची भीक मागतील. आम्हाला रक्षण करता समजतील. आणि यांना आम्ही देव वाटू यासाठी यांना एकदा झटका दिला पाहिजे असे यांना वाटत असावं.
कारण तेव्हाच या राजकारणाचा अहंकार,आत्मा शांत होईल तृप्त होईल असे मला वाटते.
मित्रांनो मी एवढ टोकाचं बोलतोय.
कारण आज कोणतीही घटना घडू घ्या..
तिला मोडून तोडून समाजासमोर मांडणं आणि त्याला जाणून बुजून जातीय वळण देणं जेणेकरून दोन समाजामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होईल. आणि लोक एकमेकांकडे जातीच्या, धर्माच्या नजरेतून कसे बघतील यासाठी नको नको ते प्रयत्न काही लोक करताना दिसत आहेत.
बीड मसाजोग प्रकरण असेल किंवा परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल किंवा आता अन्व्वा जालना कैलास बोरोडेचे प्रकरण असो.
मित्रानो तुम्ही कोणतेही प्रकरण घ्या.
या प्रकरणामधील गुन्हेगारला गुन्हेगार म्हणून बघण्यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे हे शोधून काढणे आणि त्यावरून त्याच्या संबंध जातीला टार्गेट करणे संबंध जातीला दोषी ठरवणे हे प्रत्येकच जाती धर्मातील काही बांडगुळ करत आहे.
मग ते बीड मस्साजोग प्रकरण असो की आताचे अन्व्वा जालना भोकरदन प्रकरण.
मित्रांनो या दोनही ठिकाणी जातीय वळण देऊन लोकांच्या मद्यावरील लोणी खाणाऱ्या जातीय बांडगुळांचा आणि दलालांचा सर्वप्रथम मी तीव्र निषेध करतो.
मित्रानो कोणतही प्रकरण जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होतं त्यावेळेस त्या मागील सत्यता काय आहे. त्यामागील इन साइड स्टोरी काय आहे हे जाणून न घेता व्हाट्सअप वर आलेले मेसेज आणि व्हायरल झालेल्या बातमीवरून लोक त्यावर जशास तसा विश्वास ठेवतात.
आणि त्या पोस्ट फॉरवर्ड करत राहतात.
मग काय काही क्षणांत ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरते. आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून द्वेष आणि रागाची तिरस्काराची भावना पुढे पसरत राहते.
मित्रांनो खरे म्हणजे अनवा भोकरदन जालना ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं आहे.
त्या प्रकरणाची सत्यता आपण जर समजून घेतली तर हे प्रकरण कोणत्याही जातीय हिंसाचारातून किंवा पीडित व्यक्ती ही अमुक एका जातीची आहे म्हणून त्यावरती अत्याचार झालेला नाही तर महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाच्या मंदिरामध्ये काही महिला दर्शनासाठी आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जो पीडित व्यक्ती आहे कैलास बोराडे नावाचा हा व्यक्ती देखील त्या ठिकाणी दर्शनाला आला होता. आणि त्यामध्ये कोणालाही आक्षेप नव्हता पण ही व्यक्ती मंदिरामध्ये गावातील महिला दर्शनाला आल्या असताना त्या ठिकाणी मला महादेव प्रसन्न आहे.
मी नागा साधू आहे मी काही करू शकतो आणि कोणालाही भस्मसाथ करू शकतो.
माझ्यावरती महादेवाची कृपा आहे असं सांगून अंगावरील सगळे कपडे काढून नागा बनवून तो त्या ठिकाणी मंदिरामध्ये महिला असताना प्रवेश करू पाहात होता.
आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला रोखणं खर म्हणजे गरजेचं होतं. आणि म्हणून त्यावेळी त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले गावकरी आणि गावातील तरुणांनी त्याला रोखलं.
ज्यामध्ये कोणत्याही एका ठराविक जातीचे लोक नव्हते तर सर्वच जातीतील लोक होते.
कैलास तू मंदिरामध्ये जाऊ नकोस त्या ठिकाणी महिला आहेत. तू तुझे नाटके बंद कर.
मुताड पेवून येतोस आणि काहीही सोंग करतोस.
हे तुझे नेहमीचेच नाटके आहेत म्हणून त्याला काही तरुणांनी धरून बाहेर ओढल.
मात्र पीडित कैलास हा यावेळी फुल नशेमध्ये असल्यामुळे ही व्यक्ती त्या मुलांना उमरटपणे मागे बोलताना दिसत आहे.
की सोन्या मी तुला सांगतो तू माझ्या नादाला लागू नकोस.
मी तुला भस्मासात करून टाकीन.
मला महादेव प्रसन्न आहे.
माझ्यावर महादेवाची कृपा आहे.
तू पैशाच्या जीवावर जाऊ नकोस.
तू माझ काही शेट देखील वाकड करू शकत नाही. मी तुझ काम करून टाकेल. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व जातीचे एक गोष्ट लक्षात घ्या एका ठराविक जातीचे लोक त्या ठिकाणी नव्हते. यामधील सोन्या दौड नावाच्या तरुणांने पुढाकार घेऊन त्याला बाहेर ओढल . अर्थात त्यामध्ये बाकीचे ही सामील होते. त्यामुळे फक्त एकट्या सोन्या दौड ने कैलास ला चटके दिले आणि बाकीच्यांनी त्याला विरोध केला असे नाही.
खर म्हणजे ज्या वेळेस त्याला चटके दिले त्या सगळ्या प्रकरणाला संबंध गावाचा आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांच समर्थन होतं हेच प्रथम दर्शनी दिसते.
या ठिकाणी जर आपण बारकाईने बघितलं आणि ऐकलं तर आपल्या अस लक्षात येईल की कैलास स्वतः म्हणतोय की तुला आज खरी शिवरात्र बघायची का तुला जर खरी शिवरात्र बघायचे असेल तर तु मला आजमावून बघ. आणि त्यावेळेस हा सोनू नावाचा व्यक्ती म्हणतोय तु लय नाटके करतोस तुला चटके देऊन बघू का मग तुला कळेल कसा महादेव तुझ्या अंगातला पळून जातो.
मित्रानो ज्या पद्धतीने महिलांच्या अंगात आल्यानंतर आपल्याकडे जागरण गोंधळ मध्ये महिला ठराविक वेळेपुरत्या गरम भट्टी, आणि गरम कोळशावरून अनवाणी चालतात. तशाच काहीसा हा प्रकार आहे. कारण कैलास देखील त्यांना म्हणतोय की तू मला आजमावून बघ.
तुला आज खरी शिवरात्र बघायची आहे ?
आणि त्यावेळेस मंदिराच्या परिसरात साबुदाणा शिजवण्यासाठी जी पेटवलेली चूल होती.
आता यामध्ये ही काहीजण सांगत आहेत की पूर्व प्लॅनिंग ना त्या ठिकाणी जाळ करण्यात आला त्या ठिकाणी रॉड ठेवण्यात आले आणि ते गरम अगोदरच करून ठेवलं तर अशा प्रकारचा कोणताही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे कृपया विनाकारण या प्रकरणाला तेल मीठ, मिरच,मसाला लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नका.
अर्थात ज्यांनी जे चटके दिलेत. ते निंदनीयच आहेत. आणि त्याचं समर्थन होऊ शकतच नाही. मात्र विनाकारण या प्रकरणाला एक वेगळ वळण देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.
ही हात जोडून विनंती.
मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण कैलासला चटके देतानाचा व्हिडिओ जर बारकाईने बघितला तर आपल्या लक्षात येईल की या अगोदर देखील कैलास ने स्वतःला स्वतःच्या हाताने चटकून देऊन घेतलेले आहेत असं आपल्याला दिसतं कारण आपण जर बारकाईने बघितलं तर त्याच्या अंगावरती पूर्वीचे देखील कोरडे पडलेले किंवा खपल्या निघालेले चटके आपल्याला दिसत आहेत.. जे की पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी सोन्या दौड ने त्याला चटके दिले हा पहिलाच प्रकार नव्हता तर कैलासने या अगोदर देखील दारूच्या नशेत स्वतःला चटके दिले असावेत किंवा शारीरिक त्रास करून घेत असावा. मित्रांनो थोडक्यात हा एक मानसिक आजाराचा प्रकार आपल्याला दिसतो त्यामुळे खरं म्हणजे कैलास ला आज मानसिक आधाराची गरज आहे. त्याला आज वैद्यकीय मदती पेक्षाही त्याला मानसोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाची जास्त गरज आहे. जेणेकरून त्याच दारूच व्यसनही सुटेल आणि हा जो त्याच्या मनामध्ये एक विचार बसला आहे की मला महादेव प्रसन्न आहे.
आणि यामुळे तो जे प्रकार करतो त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो नंदीला मिठी मारतोय त्याच्यानंतर महादेवाचे पिंडीला देखील तो मिठी मारतोय.
आणि हा ज्या पद्धतीने तो किळसवाना प्रकार करतोय. त्याच देखील कोणीही समर्थन करू शकत नाही..
मित्रांनो विचार करा जर हाच प्रकार कैलास च्या ऐवजी मुस्लिम धर्माच्या एखाद्या व्यक्ती कडून घडला असता तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र आज पेटून उठला असता. कारण आपल्याला आरोपी कोण आहे त्याचा गुन्हा काय आहे. यापेक्षा आरोपी कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे यावरून त्याप्रकरणामध्ये रस घ्यायचा का नाही हे आपण ठरवत असतो. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
मित्रांनो दारू पिऊन अशा प्रकारे जे आपलं धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणे आणि महादेवाची मूर्ती ची विटंबना करणे त्याला मिठी मारणे नंदीला अशा चुकीच्या पद्धतीने मिठी मारणे हे देखील तेवढंच घृणास्पद आहे.
मित्रांनो कैलास वरती जो अन्याय झालाय तो जाणून-बुजून किंवा पूर्व प्लॅनिंग ने घडलेला प्रकार निश्चित नाही. मात्र असं बोलण्याच कोणीही धाडस आज करणार नाही कारण की असं बोललं की काही जातीय दलाल आपल्याला जातीवादी ठरवायला तयार असतात..
मित्रानो आपल्याकडे एक म्हण आहे ज्या वेळेस खरं सत्य चप्पल घालून घरा बाहेर पडत तेव्हा खोटं (असत्य ) हे संपूर्ण गाव फिरून आलेल असत.
आणि असंच काहीसं अन्वा, भोकरदन प्रकरणांमध्ये झालेल आहे.
कारण ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी खुद्द पीडित आरोपी कैलास बोराडे हा सकाळी संपूर्ण शुद्धीमध्ये सांगतोय की या प्रकरणांमध्ये सोनू दौड याचा भाऊ नवनाथ दौडचा कोणताही हात नाही तो त्या ठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळे मला त्याचं नाव घेता येणार नाही मात्र त्यानंतर त्या ठिकाणी त्या परिसरातील काही राजकीय पक्षाचे दलाल आणि जातीयवादी बांडगुळ कैलास बोराडे आणि त्यांच्या कुटुंबाला जाऊन मिळाले आणि त्यांना अशा पद्धतीने सांगितले की तुम्ही तुमचं बयान बदला तुम्हाला आम्ही काही पैसे मिळवून देतो आणि यामध्ये त्यांना काही पैसे मिळवून द्यायचे आणि त्यांच्यापेक्षा कैक पटीने स्वतःच्या पदरात पाडायचे. हाच त्यांचा हेतू होता मात्र त्यांना स्वतःच्या काही थोड्याफार पैशासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाचा काय परिणाम होणार आहे. या प्रकरणाचे किती दुरोगामी परिणाम महाराष्ट्राच्या समाज मनावरती होतील. याच्याशी त्यांना काही घेणेदेणे नसतं त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची असते. मित्रांनो लोकांच्या मड्यावरचे लोणी खाणाऱ्या अशा काही विकृत लोकांमुळे आज समाज नासवल्या जात आहे. आणि दोन समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. आणि अशी लोक सर्वच जातीत असतात. त्या तमाम विकृतीला माझी हात जोडून विनंती आहे की कृपया तुमचं राजकारण तिकड चुलीत घाला.
आणि कृपया करून असे जाती जातींमध्ये धर्माधर्मामध्ये आम्हाला वाटू नका.
आज सामान्य लोकांमध्ये कुठेही जात,धर्म अडवा येत नाही. त्यामुळे आम्हाला गुण्यागोविंदाने नांदू द्या तुम्हाला तुमचं राजकारण लखलाभा.
पण कृपया अशा पद्धतीने जाती जातींमध्ये विष कालवू नका ही पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो.
काल छगन भुजबळ साहेब म्हणाले की महाराष्ट्राला कोणाचीतरी दृष्ट लागली आहे.
भुजबळ साहेब तुमचं खरं आहे.
पण भुजबळ साहेब महाराष्ट्राला कोणाची तरी नाही तर तुमच्या सारख्या राजकारणाची दृष्ट लागली आहे. खर म्हणजे तुम्हाला एकट्याला दोष द्यायचा नाहीये तर सर्वच राजकारण्यांची आणि राजकीय दलालांची दृष्ट लागलीये महाराष्ट्राला.. आणि
आज या काही ठराविक लोकांमुळे संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होत आहे.
कारण नको त्या गोष्टीला जातीय वळण लावून द्यायचं आणि कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्याला तेल मीठ मिरची मसाला लावून त्या गोष्टीचं त्या प्रकरणाचा भांडवल आपल्याला कसं करता येईल त्या प्रकरणाचा आपल्या आपल्या राजकारणासाठी कसा फायदा करून घेता येईल हेच आणि हेच फक्त डोळ्यासमोर ठेवायचं.
बाकी समाजावरती, समाजमनावरती त्याचा काय परिणाम होईल समाजामध्ये त्याचे किती दुरोगामी परिणाम होईल याचा विचार करायचा नाही.
असो भुजबळ साहेब शेवटी तुम्ही मनालात की सर्वांनी एकत्र येऊन यावरती चिंतन केले पाहिजे.
हे मात्र मला पटल. मी या बाबतीत तुमचं नक्की समर्थन करतो की. कृपया सर्वांनी एकत्र बसा यावरती चर्चा करा आणि यापुढे कोणत्याही प्रकरणाला जातीच्या चष्म्यातून जातीच्या नजरेतून आपण बघणार नाही तर गुन्हेगाराकडे फक्त गुन्हेगार म्हणून आपण बघू आणि पीडिताकडे फक्त पीडित म्हणूनच आपण बघितले पाहिजे.
ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी विधानसभेत जाता तर त्यावेळेस आपण शपथ घेता की मी कोणाबद्दलही ममत्व भाव किंवा कोणाबद्दल पूर्वग्रह किंवा द्वेष भावना बाळगणार नाही. सर्वांकडे पालकत्वाच्या भूमिकेतून बघेल ती शपथ आपल्याला सर्वच राजकारण्यांना परत एकदा आठवण करून देण्याची गरज आज वाटते आहे.
आणि ती शपथ आपण रोज विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू करण्यापूर्वी घेणे खरं तर गरजेचे झालं आहे.
जेणेकरून महाराष्ट्र मध्ये कोणत्याही निर अपराध व्यक्ती वरती अन्याय होणार नाही त्याचा हकनाक बळी जाणार नाही.
मित्रानो आपले संविधान हे 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरापराध व्यक्ती वरती अन्याय झाला नाही पाहिजे या तत्त्वावर चालते. आज कैलास वरती अन्याय झाला हे मान्य आहे.
त्या आरोपींना काय शिक्षा द्यायची हे कोर्ट ठरविलच मात्र उद्या या प्रकरणांमध्ये ज्याचा काहीही दोष नाही अशा व्यक्तीला हाकनाक बळीचा बकरा करू नये एवढीच माफक अपेक्षा राहील.
बोलण्यासारखं भरपूर आहे.
शेवटी फक्त एवढीच विनंती की कैलासला योग्य तो उपचार मिळो आणि कैलास च्या आरोपींना देखील योग्य तीच शिक्षा मिळो.
या ठिकाणी थांबतो धन्यवाद.
जय हिंद जय महाराष्ट्र…
✍️ योगेश पवार पाटील, जालनाकर