मित्रांनो इतिहास – Histroy
मग ती कोणाचीही असो कोणत्याही देशाची असो कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची असो.
जगाच्या पाठीवरील कोणाचाही इतिहास घ्या त्यांमध्ये अनेक मते मतांतरे आहेत.
कोणतही इतिहासाच पुस्तक म्हणजे निर्विवाद सत्य किंवा सर्व मान्य असू शकत नाही.
त्याच कारण म्हणजे प्रत्येक इतिहासकाराणे आतापर्यंत आपापल्या सोयीने इतिहास लिहिलेला आहे.
आणि वाचणाऱ्यानी देखील आप आपल्या
सोयीने इतिहास वाचलेला असतो.
त्यामुळे कोणाला इतिहासामध्ये व्हीलन हिरो वाटत असतो. तर कोणाला हिरो देखील व्हीलन वाटत असतो.
खर म्हणजे मानवी स्वभाव हाच फार विचित्र आहे.
त्याला तुम्ही जश्या पद्धतीने ट्रेन कराल तश्या पद्धतीने तो ट्रेन होतो..
मित्रांनो कुत्र्याला जश्या पद्धतीने ट्रेन केल जात किंवा
रॉबट ज्या पद्धतीने ट्रेन केला जातो.
त्याच पद्धतीने माणूस देखील आपल्या आजूबाजूच्या परिसर आणि आजूबाजूच्या समाजाकडून शिकत असतो आणि त्याच प्रमाणे ट्रेन म्हणजे घडतं असतो.
आणि त्यामुळे तो ज्या परिसरात ज्या समाजात ज्या वातावरणात वाढलाय तेच त्याला जवळच आणि अंतिम सत्य वाटत असतं.
बऱ्याचदा आपण पाहतो की
एखाद्या दारुद्द्याच्या मुलाला चांगलं माहित असत की आपला बाप दारुडा आहे.
आपला बाप चोर आहे. आपला बाप निकम्मा आहे. तो रोज त्याला मनात शिव्या देखील देत असतो. एवढीच नाही तर
एखाद दोन वेळेस त्याने बापाला हाताखालून देखील काढलेल असत. पण त्याच बापाला जेव्हा बाहेरची लोक एखादी साधी शिवी देतात किंवा वाईट बोलतात.
तर त्याला ते अजिबात सहन होत नाही.
एखाद्या नवऱ्याला कितीही माहित असू द्या की आपली बायको छ**** आहे आपली बायको आपल्याला फसवते आहे, आणि त्याला तिचा प्रचंड राग येत असतो. अगदी त्याला वाटत असते की हिचा गळा दाबून जीव घ्यावा.
पण त्याच बायकोला जेव्हा एखादा बाहेरचा काहीतरी बरं वाईट बोलतो किंवा तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न करतो तर त्या पुरुषाला ते सहन होत नाही.
इतिहासाचे देखील अगदी तसंच आहे.अनेकांना माहिती आहे की आपल्याच काही लोकांनी शेण खाल्लेले आहे आपल्या लोकांनी चुका केलेल्या आहेत. एकांतात ते त्या चुका मान्य देखील करतात आणि मनातून त्यांना त्याचा राग देखील येत असतो पण पब्लिकली जेव्हा इतिहासातील काही ठराविक लोकांच्या चुकावरून एखादा संपूर्ण समाज, जात टार्गेट केली जाते.
एखाद्या संबंध जातीला दोषी ठरवल्या जात तर त्या जातीतील काही लोकांना राग येणे हे सहाजिकच आहे. खर म्हणजे तो मानवी स्वाभाव आहे..
त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की तो मुलगा त्याच्या बापाला आदर्श मानतोय, तो नवरा त्याचा बायकोला पतिव्रता मानतोय किंवा तो व्यक्ती इतिहासातील त्या चुकीच्या व्यक्तीच समर्थन करतोय.
मित्रांनो.
आपल्या देशाची समाज व्यवस्थाच अशी विकृत बनवली आहे की, इथे एवढा जातीवाद, एवढा टोकाचा धर्मवाद शिकवला जातो की इथे लहानपना पासूनच मुलाला, आपली जात, आपला,धर्म,आपला सोयरा, आपला अमुक आपला तमुक एवढ प्रकर्षाने शिकवलं जात की ती त्याची जात,त्याचा धर्म त्याच्या एवढ्या नसानसात भिनतो. की
तो कधी आपल्या जातीतील चुकीच्या व्यक्तीचं देखील समर्थन करायला लागतो हे त्यालाही समजत नाही. .
त्याला आपल्या जातीतील एखाद्या व्यक्तीचा केलेला अपमान म्हणजे आपलाच अपमान वाटायला लागतो हे देखील कळत नाही.
आणि याच मुळे आज जातीची धर्माची आंदोलन चालवणाऱ्याना सुगीचे दिवस आले आहेत.
आणि याचमुळे लोक आपल्या जातीतील चुकीच्या व्यक्तीचं, चुकीचं गोष्टीच देखील समर्थन छाती ठोकपणे करत आहेत.
आणि याला जबाबदार ते नाही तर इथली सगळी समाज व्यवस्था आहे.
मित्रानो हे सगळ बदलायचं असेल तर इथल्या तरुणांनी या जातीच्या धर्माच्या चौकटीतून बाहेर पडल पाहिजे. जातीची धर्माची आंदोलन करणारे मग ते समाजकारणी असो किंवा राजकारणी हे समाजाचं कधीच हित करू शकत नाहीत ते फक्त समाजाला गुमराह करून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करू शकतात आणि जनतेवर राज्य करू शकतात.
आणि हे मी कोणत्याही एका ठराविक जाती बद्दल धर्माबद्दल किंवा नेत्या बद्दल बोलत नाहीये.
त्यामुळे कोणीही स्वतःला मिरची लावून घेऊ नये.
मित्रांनो आजचा काळात जातीच्या धर्माच्या भिंती झुगारून देऊन सगळ्यांनी माणूस म्हणून एकत्र येण्याचा आहे. एकीकडे लोक आज लोक चंद्रावर चालले तर एकीकडे आपण आजही जातीच्या धर्माच्या आणि तु माझा सोयरा की मी तुझा सोयरा, तू हलका मी भारी. 96 कुळी, 92 कुळी तू ब्राह्मण मी मराठा,= मी वंजारी, मी मुसलमान , मी शीख मी ईसाई मी गुजराती मी मराठी यामध्ये एवढ गुंतलोय की मी माणूस आहे हे विसरूनच गेलोय.
मित्रांनो मी फार शहाणा आहे किंवा मला फार कळतं अशातला भाग नाही पण लक्षात घ्या आज सगळ्यांना माहिती आहे की कोणीतीही जात असो किंवा धर्म असो त्याची निर्मिती ही देवाने नाहीतर माणसाने केली आहे. कोणत्याही जातीचा धर्माचा निर्माता हा देव नाही हे सगळ्यांना शंभर टक्के माहित आहे पण तरी देखील आज जरी तुम्ही लोकांना विचारलं की
हिंदू धर्म महान आहे की मुस्लिम तर
मुस्लिम म्हणतात मुस्लिम धर्म हेच अंतिम सत्य आहे.
बौद्ध म्हणतात बौद्ध धर्म हेच अंतिम सत्य आहे.
तर हिंदू म्हणतील हिंदू हा सनातन धर्म आहे आणि तोच अंतिम सत्य आहे.
इसाई म्हणतात येशू हेच अंतिम सत्य आणि खरा धर्म आहे.
तर पुढे जातीच्या,महापुरुषाच्या बाबतीत देखील हीच बोंब आहे.
प्रत्येकाला आपली जात,
आपल्या जातीतला महापुरुष.
आपल्या जातीत, आपल्या भागात, आपल्या भाषेत जन्माला आलेला उद्योगपती राजकारणी अभिनेता हा आपल्या जवळचा वाटत असतो कारण त्यासोबत आपली अप्रत्यक्षरीत्या का होईना एक इमोशनल अटॅचमेंट असते.
त्यामुळे जाती आणि धर्मातील आपल्या माणसातील वाईट गुण, आपल्या माणसाच्या नकारात्मक बाजूकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करत असतो.
खर म्हणजे
प्रत्येकाला आपल्या जाती,धर्माबद्दल, आपण ज्यापरिसरातून आलो त्या भूमी बद्दल, भाषेबद्दल आणि आपल्या माणसाबद्दल मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर असतोच असतो. आणि यापासून कोणताही इतिहासकार लेखक देखील सुटलेला नाही त्यामुळे कोणताही लेखक आणि इतिहासकार निपक्षपणे आतापर्यंत इतिहास लिहू शकलेला नाही.
प्रत्येक इतिहासकाराने आतापर्यंत फक्त आपल्या सोयीने आणि त्याकाळात उपलब्ध असलेल्या साधनाच्या आधारावर केलेली आहे. तर
बऱ्यापैकी लेखक हे लिहिताना वाचकाना वाचायला काय आवडेल त्यानुसार लिहित असतात त्यामुळे लेखनामध्ये वांस्तव्वा पेक्षा कल्पनाविलासावर जास्त भर दिलेला असतो.
जसे की आज चित्रपट निर्माते करतात.
तुम्ही कोणतेही इतिहासकार घ्या
मग ते मोघल इतिहासकार असो, इंग्रज इतिहासकार की ब्राम्हण, मराठा, किंवा अलीकडच्या काळातील प्रतिगामी,पुरोगामी प्रत्येकाच्या लेखनामध्ये वास्तव आणि इतिहासापेक्षा त्यांच्या विचाराचा अंतर्भाव झालेला दिसतो. अगदी
काही बोटावर मोजण्या एवढे इतिहासकार जर सोडले तर कोणीही तटस्थपने इतिहासाची मांडणी केलेली नाही हे सत्य आहे. फक्त आपल्याला जो चांगला वाटतो आपल्याला जो सोयीचा आहे तोच इतिहास सत्य आणि खरा आपण मानतो.
त्यामुळे सध्याचा उपलब्ध असलेला इतिहास म्हणजे निर्विवाद सत्य असा मानण्याचा मूर्खपणा कोणीही करू नये.
आणि इतिहासा कडे फक्त आणि फक्त एक प्रेरणा, बोध आणि मनोरंजन या यादृष्टिकोनातूनच बघावे.
त्यासोबत फार इमोशनली अटॅच होऊ नये.
होय.
मी हे वाक्य फार गंभीर पूर्वक बोलतोय की इतिहासासोबत फार इमोशनली अटॅच होऊ नये.
मित्रांनो जीवन फार सुंदर आहे त्याचा आनंद घ्या आणि त्यासाठी वर्तमनात जगायला शिका. वर्तमानाचा आनंद घ्या इतिहासामध्ये कोण कसा होता कोण किती वाईट होतात त्यावरून एकमेकांची मोजमाप काढने एकमेकाला पाण्यात पाहणे सोडून द्या.
आणि इतिहासावरून वर्तमानामध्ये सोशल मीडियावर वाद तर कदापि घालत बसू नका.
इतिहासावरून वर्तमाना
मध्ये वाद घालत बसणे म्हणजे मेलेली मढी उकरत बसण्याचं काम आहे.
ज्या मधून हाती काही पडत नाही.
हाती पडतो तो फक्त मनस्ताप.
हाती पडतो तो फक्त एकमेकांबद्दलचा द्वेष.
हाती पडतो तो फक्त आणि फक्त अहंकार.
हाती पडतो तो फक्त मी भारी का तू भारी.
आणि कदाचित याचमुळे कोणीतरी म्हटलं आहे की इतिहासावरून वर्तमानामध्ये वाद घालत बसणे म्हणजे आपला भविष्यकाळ खराब करून घेणे आहे.
मित्रांनो इतिहास वाचला पाहिजे यामध्ये कोणतंही दुमत नाही पण इतिहास यासाठी वाचला पाहिजे की इतिहासात ज्या चुका आपल्या पूर्वजांकडून झाल्या त्या आपल्या कडून आपल्या भविष्यात होऊ नये.
ना की एक दुसऱ्यांची उणी धुणी काढत बसण्यासाठी.
मित्रांनो विचार करा 400, 500, हजार 5000 वर्षांपूर्वीचा इतिहासावरून आज 2025 मध्ये जर आपण एकमेकांसोबत भांडत असू,एकमेकांसोबत वाद घालत असू तर असा इतिहास वाचून काय फायदा.
मित्रानो एक गोष्ट लक्षात घ्या. दोन्ही बाजूचे इतिहासकार, संघटना आणि काही ठराविक लोक जाणून बुजून इतिहासावरून वाद घालत असतात कारण त्यांचे इतिहास हे जगण्याचे भांडवल असते आणि त्यावर त्यांचे घर संसार चालत असतो त्यामुळे इतिहासामधील मढी उकरून काढून त्यावरून जाणून बुजून वाद निर्माण करणे आणि त्यावरून प्रसिद्धी मिळवणे तसेच त्यावरून समाजामध्ये अशांतता पसरवणे, द्वेष पसरवने हा काहींचा खानदानी धंदा झाला आहे. इतिहास हे त्यांच्या साठी भांडवल आहे.
मग आपण काय आहोतच एकमेकाची डोके फोडायला.
म्हणून मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे.
की कृपया अशा विकृत लोकांना ओळखा.
आणि या लोकांना जास्त सिरीयस घेऊ नका.
कारण आज विज्ञानाने माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली आहे पाण्यापासून झाली आहे. हे सिद्ध केलेले असताना देखील जगातील कोणताही धर्म हे सत्य स्वीकारायला तयार नाही.
आणि लोकांना जर विज्ञानाचे तथ्य मान्य होत नसतील तर. या लोकांनी आम्ही सांगतो तोच इतिहास खरा आणि आम्ही मानतो तोच इतिहास खरा माना असा दावा करण्याचा मूर्खपणा कोणीही करू नये. कोणावरही जबरदस्ती करू नये.
कारण येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा,
आपले विचार बाळगण्याचा थोडक्यात विचार स्वतंत्र्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे.
प्रत्येकाला आपले महापुरुष आपले आदर्श ठरवण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये आहे त्यामुळे कोणाच्याही आदर्शांचा अनादर होणार नाही याची काळजी आपण घेऊयात आणि शक्यतो अशा वादाच्या प्रकरणापासून दूर राहूयात.
मला वाटत यातच आपले आणि भविष्यपिढीचे हित आहे अस मला वाटत.
खर म्हणजे प्रत्येक गोष्टीला शब्दाने उत्तर देण्याची गरज नसते.
अनुलेखाने मारने हीच खरी काही लोकांची शिक्षा असते.
मात्र आज आपलं दुर्दैव की अशा प्रकरणाला मीडिया उलट तेल मीठ लावण्याचं काम करत आहे.
अशा वादग्रस्त प्रकरणाला मीडियाने खरंतर पडदा घातला पाहिजे मात्र अशा प्रकरणाला मीडिया याउलट फुस देण्याचं काम या अशा प्रकरणाला प्रसिद्धी देण्याचं काम मीडिया करत आहे आणि समाजामध्ये अशांतता समाजामध्ये एकमेकांबद्दलचा द्वेष एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होईल अशा प्रकारच्या चर्चा जाणून-बुजून आपल्या टीआरपी साठी मीडिया घडून आणते आहे. मित्रानो हे फार दुर्दैवी आहे. माझे देशातील सर्व सामान्य जनतेला, आणि खास करून तरुणांना आवाहन आहे की सामान्य नागरिकांनी हा मीडियाचा इतिहासकारांचा आणि राजकारण्यांचा, राजकारण्यांच्या चेल्याच्या, प्रतिगामाच्या आणि या पुरोगामच्या नादाला लागू नका. तुम्ही म्हणाल
मग काय करायचं तर मित्रांनो आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय केलं पाहिजे तर दोन्ही बाजूचा इतिहास वाचून किंवा समजून घेतला पाहिजे. आणि दोन्ही बाजूच्या इतिहासामधील चांगलं जेवढं आहे तेवढे आपण घेतल पाहिजे.
कोणीतरी म्हटलंय की Take the best and leave the rest.
आपल्याला जे पटलं नाही जे आपल्याला रुचलं नाही ते सोडून द्यायचं त्यावरून वाद घालत बसायचं नाही आपलं वर्तमान आणि आपला भविष्य खराब करून घ्यायचा नाही एवढंच या निमित्ताने बोलतो बाकी आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची आपले मत आपले प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
✍️ योगेश पवार पाटील
Mob.9881574736